
बँकेच्या सभासदांसाठी जाहीर निवेदन
(बँकेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा)
(फक्त सभासदांकरिता)
बँकेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.१५ मार्च २०२१ रोजी सकाळी ठीक १०. वा. आचार्य अत्रे सभागृह, स.तु.नगर पिंपरी पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या संबधीची नोटीस दि. १.३.२०२१ रोजी “दैनिक पुढारी” या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली असून सदरची नोटीस दि.१.३.२०२१ रोजी प्रत्यक्ष पाठविण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भावाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांनी कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर दि. २५.२.२०२१ रोजी परिपत्रक क्र.२४ /१३ परिपत्रकानुसार सहकारी बँकांना VC/OAVM या Online पद्धतीने वर नमूद केल्या प्रमाणे सभेचे आयोजन केले आहे. त्यानुसार सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपले संपूर्ण नाव / सभासद क्रमांक / मोबाईल क्रमांक खाली दिलेल्या E-Mail ID व What’s app मोबाईल क्रमांक यावर नोंद करावी म्हणजे सभासदांना Online पद्धतीने सभेत सहभागी होता येईल. नोंदणीकृत सभासदांना सभेची लिंक नोंद केलेल्या What’s app मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येईल. किंवा खालील लिंक वर आपली माहिती दि.१२.३.२०२१ पर्यंत भरून पाठवावी.
लिंक :
E-Mail ID : admin@pcsbank.in
Mobile No. : 9011081751 (What’s app No)
सूचना :
१) नोटीस मध्ये उल्लेख केल्या प्रमाणे आचार्य अत्रे सभागृह, स.तु.नगर पिंपरी पुणे १८ या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित न राहता सर्व सभासदानी VC/OAVM या Online पद्धतीद्वारे सभेमध्ये सहभागी व्हावे.
२) सभासदांचे प्रश्न वर नमूद कलेल्या E-Mail ID वर दिनांक १४.०३.२०२१ पर्यंत पाठवावे हि विनंती.
दिनांक :- ०६ / ०३ / २०२१
मुख्य कार्यकारी अधिकारी